एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग

ERP – 4
ERP – 3
ERP – 2
ERP – 1

एकूणच प्रकल्प पूर्ण

टीएमसीला असे जाणवले आहे की नागरिकांना काही सुविधा मिळवण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागतो आणि टीएमसीच्या कार्यालयात अनेक वेळा यावे लागते परिणामी नागरिकांवर ताण पडतो. टीएमसी ने वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेऊन सर्व सुविधा प्रदान करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे, ज्यामध्ये सेवा पुरवणाऱ्या अंतर्गत विभागांचे उत्तरदायित्व, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता या गोष्टींना महत्व देण्यात आले आहे. टीएमसीने अंतर्गत व्यवस्थापनासाठी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग प्रस्तावित केले आहे, जेणेकरून त्यातील एकात्मिक एप्लिकेशनमुळे सेवांचे व्यवस्थापन आणि बॅक ऑफिसमधील अनेक कार्य संगणीकृत करणे शक्य होणार आहे.

उद्दिष्टे:
  • नागरिकांना स्थानिक सरकारी सुविधा ऑनलाईन/एक खिडकी प्रकाराने प्रदान करताना सुलभ, सोयीस्कर, पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत देणे शक्य होईल.
  • माहितीचा प्रवाह आणि पारदर्शकता यांसाठी ठामपामधील संबंधित विभाग/कार्य एकात्मिक करणे.
  • नागरिकांना टीएमसीचे कार्य व सेवांच्या सद्यस्थितीतील संपूर्ण आणि अचूक माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे.
  • बॅक ऑफिसमधील प्रणालीचे ऑटोमेशन आणि त्यांचा अधिकाधिक वापर करून पालिकेची अंतर्गत कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे.
  • विविध सेवांची बिले, कर, सेवांची वैधानिक देयके भरण्यासाठी सुरक्षित, सुविधाजनक ऑनलाईन पेमेंट सुविधा देणे.
  • टीएमसीचा प्रशासकीय खर्चाचा बोजा कमी करून किफायती सेवा प्रदान करणे.
  • टीएमसीला आपले मूळ कार्य व जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दैनंदिन कार्यातून (जसे कर संकलन, प्रमाणपत्रांचे वितरण इ.) मुक्त करणे आणि परिणामी प्रशाकीय यंत्रणेची एकूण उत्पादकता वाढवणे.
  • पालिका आणि नागरिकांमधील अंतर कमी करून कार्यवाही पूर्ण करण्याचा वेळ व पालिकेशी प्रत्यक्ष येणारा संबंध कमी करणे.
  • नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये इतर स्थानिक संस्थांच्या तुलनेत सर्वोत्तम प्रणाली राबवणे.
ठळक वैशिष्टये/घटक

१. एप्लिकेशनसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर):

(अ) वेबवर आधारित सेंट्रल एप्लिकेशन

(ब) अंतर्गत प्रणालींचे स्वयंचालन (ऑटोमेशन)

(क) जीआयएस बरोबर इंटिग्रेशन करणे

(ड) मदत कक्ष (कर्मचाऱ्यांसाठी)

२. बॅक ऑफिस प्रणाली:

अ) या सोल्युशनसाठी आवश्यक हार्डवेअर खरेदी करणे

ब) गो लाईव्ह झाल्यानंतर संबंधित एप्लिकेशनची ५ वर्षं देखभाल करणे

क) प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणे

ड) या प्रणालीच्या योग्य आणि शाश्वत वापरासाठी 'चेंज मॅनेजमेंट' चा वापर करणे

३. सर्व्हिस डिलिव्हरीसाठी पायाभूत सोयीसुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर):

अ) नागरिकांसाठी मदत कक्ष: टीएमसीसाठी मानक एफएक्यू (सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न) व मॅन्युअल्स जे नागरिकांच्या तक्रारींसाठी उभारल्या जाणाऱ्या कॉल सेंटरसाठी उपयुक्त ठरतील.

 

निविदा प्रसिद्ध दिनांक : निविदा प्रकाशित
सद्यस्थिती: कार्यादेश देण्यात आलेला आहे.
कार्यादेश दिनांक: 08/03/2019
ठेकेदाराचे नाव : ABM Knowledgeware Limited
स्थितीः कार्यान्वीत
मंजुर निविदा रक्कम: INR. 13.99 Cr
प्रकल्पाचा कालावधी : ५ वर्षे
भौतिक प्रगती: 61%
आर्थिक प्रगती : 5%
Expenditure Till Date: INR 0.70 Cr

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत