ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वेकडील बाजूस मल्टीमोडल ट्रान्झिट हब व स्टेशन परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प (सॅटिस)- पूर्व

SATIS – 12
SATIS – 11
SATIS – 10

एकूणच प्रकल्प पूर्ण

प्रकल्प दिल्याचा दिनांक
ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वेकडील बाजूस मल्टीमोडल ट्रान्झिट हब व स्टेशन परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प (सॅटिस)- पूर्व

प्रकल्प स्थिती: प्रगतीपथावर
शेवटचे अद्यावत: ऑगस्ट 13, 2020

Feb 09 2020

भारतीय रेलवे सर्वात जुनी असलेली रेल्वे मार्गिका वरील ठाणे हे जुने रेलवे स्थानक आहे. हे रेल्वे सथानक मध्ये, रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थालकामधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे.

ठाणे स्थानकामधून सद्यस्थितीत दररोज सुमारे 7.50 लक्ष प्रवासी प्रवास करतात. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये येण्यासाठी दाटीवाटीने वसलेल्या जुन्या शहरांमधील अपुऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे वाढत्या मागणीनुसार शहराअंतर्गतच्या रस्त्यावरील ताण प्रचंड वाढत असून वाहतुक कोंडीही दैनंदिन झाली आहे. सबब, सॅटीस प‍श्चिमेच्या धर्तीवर मल्टी मोडल ट्रान्झिट हब (सॅटिस)- पूर्व चे नियोजन करण्यात आले आहे.

प्रकल्पाची व्याप्ती :

 • पुर्व द्रुतगती महामार्ग सेवा रस्ता तुळजा भवानी माता मंदीर ते कोपरी कन्हैयानगर एम.जे.पी. कार्यालयापर्यंत एकूण 2.24 कि.मी. लांबीच्या उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. यापैकी 1.693 कि.मी. लांबीचा 3 मार्गिका असलेला (12 मी. रुंद) व उर्वरित 0.547 कि.मी. लांबीचा 2 मार्गिका असलेला (8.50 मी. रूंद) उन्नत पूलाचा समावेश आहे.
 • या मार्गिकेस ठाणे स्थानक पूर्व लगत असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी 9000 चौ.मी. (तळघर, तळमजला, मध्यम स्तर, डेकपातळी) क्षेत्रफळाच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीचा डेक एरिया बांधण्यात येईल.
 • सदरच्या डेक एरियावर शहर बस थांबे व प्रवासी सुविधा (प्रसाधन गृह, फुडकोर्ट इ.) चे रेल्वे पादचारी पूलासमवेत एकत्रित विकास करण्यात येईल.
 • सदर डेक एरियामध्ये ‘रेल्वे स्थानक इमारत’ ही रेल्वेमार्फत भविष्यात बांधण्यात येईल.
 • प्रस्तावित डेकच्या खाली, तळमजल्यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केले आहे.

प्रकल्पाचे फायदे:

 • शहरांतर्गतच्या वाहतूकीच्या विविध माध्यमांचे ठाणे रेल्वे स्थानकासमवेत विनव्यत्यय एकत्रीकरण
 • ठाणे (पूर्व) स्थानक परिसरातील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत
 • सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या सक्षमीकरण्यासाठी संरक्षित व विशेष मार्ग.
 • पादचारी प्रवाश्यांसाठी विशेष सुविधा.
 • वाहतुक विषयक सुविधांसाठी जसे पार्किंग, खाजगी प्रवासी वाहतुकीच्या माध्यमांसाठी सुविधा इ. करीता रेल्वे परिसरामध्ये अतिरिक्त जागेची निर्मिती.
 • इंधन खर्चामध्ये बचत व परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

प्रकल्पाची सद्यस्थिती काम प्रगतीपथावर आहे

निविदा प्रसिद्ध दिनांक : 09/08/2018
सद्यस्थिती: कार्यादेश देण्यात आलेला आहे.
कार्यादेश दिनांक: 07/03/2019
ठेकेदाराचे नाव : मेसर्स एनसीसी एसएमसी सॅटिस जेव्ही लि
मंजुर निविदा रक्कम: INR. 260.85 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 3 Years
भौतिक प्रगती: 31.00%
आर्थिक प्रगती : 27.00%
Expenditure Till Date :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत