पावसाळी पाण्याचा निचराकरणाऱ्या नाल्यांचे बांधकाम करणे

पावासाळी पाण्याचा निचराकरणे ही पायाभूत सुविधापैकी महत्वाची पायाभूत सुविधा असून सदसयास्थितीत ठाणे महानगरपालिके मार्फत ही सुविधा देण्यात आलेले आहे. ठाणे महानगरपालिके मार्फत या आधीच नैसर्गिक नाला प्रवाह पक्क्या स्वरुपात बांधणेचे तसेच अस्तित्वातील नाल्यांचे मजबुतीकरण करण्याचे कामाकरीता एकात्मिक नाले विकास प्रकल्प राबविणेत आलेले आहे.

अधिक

अर्बन रेस्ट रूम

ठाणे महानगरपालिका ही ठाणे शहरासाठी स्वच्छतेच्या सुविधा प्राधान्‍याने पुरविण्याची जबाबदारी घेणारी स्वायत्त संस्था आहे. ठाणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आणि स्थानिक प्रवासी वाहतूक या सर्व सुविधांचा दररोज ६.५० लक्ष प्रवासी लाभ घेत आहेत. परिणामी आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात ठाणे शहरासह लगतच्या महानगर व उपनगरात ये - जा करणा-या नागरिकांसाठी सुयोग्य व महत्वाचे ठिकाण असणारे भारतातील सर्वात व्यस्त असे एक शहर आहे. यासाठी एबीडी क्षेत्रात नागरिकांच्या दैनंदिन स्वच्छता सुविधा असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ठाणे स्मार्टसिटी योजने अंतर्गत प्रकल्पाचा एक भाग म्हणून ठाणे महानगपालिका परिक्षेत्रात विविध ठिकाणी १२ अर्बन रेस्टरूम (स्वच्छतागृहे) उभारण्याबाबत महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.

अधिक

मसुंदा तलाव सुशोभीकरण

मासुंदा तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून सदर तलावालगत नागरिकांसाठी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच ठाणे शहराचे सांस्कृतीक भुतकाळाची जपणूक करण्याचे दृष्टिकोन लक्षात घेवून तलावाचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. सदर सौदर्यीकरणामुळे तलाव परिसरात नवीन झळाळी प्राप्त होणार आहे.

अधिक