इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
-
- अद्ययावत डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून ठाणे शहराच्या सर्व नागरी सेवा-सुविधांचेनियंत्रण आणि मॅनेजमेंट एका ठिकाणावरून करण्याच्या उद्देशाने इन्फोर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वर आधारित यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी इंटीग्रेटेड डेटा सेंटर व कमांड आणि कंट्रोल रूम सुविधे ची उभारणीकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी च्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आलीआहे.
-
- सदर इंटीग्रेटेड डेटा सेंटरची उभारणी हजुरी येथे करण्यात आली आहे. आज मितीला १० रॅक्सची उभारणी करण्यात आली आहे पण येत्या पुढील ५ वर्षाच्या काळात ४० रॅक्सची अजून उभारणी करता येण्याची क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे. ही डेटा सेंटर सुविधा टियर –iii मांनाकना साठी पात्र आहे. तसेच सदर ठिकाणी १६ सिटर क्षमतेच कमांड आणि कंट्रोल सेंटर पण सुरू करण्यात आलेआहे.
-
- सद्य स्थितीत चौदाशेहुन अधिक कॅमेरे सदर इंटीग्रेटेड डेटा सेंटर व कमांड आणि कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहेत. तसेच 1200 कॅमेऱ्यांसाठीची व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टिम व 240 कॅमेऱ्यांसाठीची व्हिडिओ अनेलेटीक सिस्टिम कार्यरत करण्यात आली आहे.
- सर्व पालिका व्यवस्थापन प्रक्रियांची सेन्सर्स व संगणिकरणाच्या माध्यमातून माहिती गोळा करून व प्राप्त सत्य व अचूक माहिती वर आधारित योग्य व त्वरित निर्णय घेणे सदर इंटीग्रेटेड डेटा सेंटर व कमांड आणि कंट्रोल रूमच्या माध्यमातून शक्य होणार आहे. तसेच खालील नमूद सर्व व्यवस्थापन प्रक्रियांचे व्यवस्थापन त्वरित व योग्यरित्या करता येणे शक्य होणार आहे:
-
- पिण्याचे पाणी व्यवस्थापन, सांड पाणी व्यवस्थापन,घन कचरा व्यवस्थापन,ओला कचरा व्यवस्थापन,पथदिवेव्यवस्थापन, नूतन व अपारंपारिकविद्युत निर्मिती व्यवस्थापन, एकत्रित विद्युत ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन, स्वास्थ्य सेवा व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन, क्रीडा आणि मनोरंजन व्यवस्थापन, झाडे आणि बगीचा व्यवस्थापन, शिक्षण व्यवस्थापन, महापालिका कार्य व कर संकलन व्यवस्थापन व इतर विभागीय दैनंदिन व्यवस्थापन.
- अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन, आप्पत्ती व्यवस्थापन, रस्ते वाहतूक व्यवस्थापन, नागरिक सुरक्षा, नागरिक मदत सेवा व्यवस्थापन, रोगराई प्रतिबंधक उपाय योजना व्यवस्थापन.
- पुढील काळात वरील व्यवस्थापन प्रक्रियांची सेन्सर्स व संगणिकरणाचे काम जेंव्हा पूर्ण होईल तेंव्हा त्यांना इंटीग्रेटेडइन्फोर्मेशन मॅनेजमेंट प्लेटफार्मला जोडण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच बाराशेहुन अधिक कॅमेरे, पंचवीस लाखाहून ज्यास्त सेन्सर्स व पन्नास विविध इन्फोर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून येणाऱ्या माहिती वर प्रक्रिया करून योग्य तो निर्णय घेता यावा यासाठी इंटीग्रेटेड इन्फोर्मेशन मॅनेजमेंट प्लेटफार्म ही यंत्रणा पण कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
- याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून पोलिस आयुक्त कार्यालय येथे सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील चौकातले 400CCTV कॅमेरे पाहण्यासाठीची व्यवस्थापकीय यंत्रणा व 80CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहिती चे विश्लेषण करून शहरातील गुन्ह्यान्वरनियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | काम पूर्ण |
कार्यादेश दिनांक: | 08/03/2019 |
ठेकेदाराचे नाव : | मेसर्स एचपीई इंडिया प्रा. लि. |
स्थितीः | कार्यान्वीत |
मंजुर निविदा रक्कम: | INR. 46.50 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | ५ वर्षे |
भौतिक प्रगती: | 100% (Hardware) |
आर्थिक प्रगती : | 60.50% |
Expenditure Till Date: | INR 28.11 Cr |
Comments are closed.