विनामूल्य वायफाय आणि सीसीटीव्ही
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
सदर प्रकल्प, ठाणे शहरातील नागरिकांसाठी विनामूल्य वायफाय सेवेद्वारे इंटरनेट सुविधा (किमान 800 केबीपीएस वेगाची हमी ) देण्यासंबंधी आहे. त्यात या सेटअपची 10 वर्षांसाठी संरचना, संचालन, देखभाल (हार्डवेअर. सॉफ्टवेअर, मनुष्यबळ आणि इतर आवश्यक खर्च) विचारात घेतले आहे. संबंधित विक्रेत्याने पीपीपी कराराअंतर्गत 400 सीसीटीव्ही कॅमेरे आणि किमान 1600 कॅमेऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सोयीसुविधा देणे अपेक्षित आहे.
उद्दिष्टे:
-
- ठाण्यातील नोंदणीकृत नागरिक आणि अभ्यागत/पर्यटकांसाठी इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी सहज उपलब्ध होईल असे सार्वजनिक वायफाय जाळे उपलब्ध करून देणे
-
- सुरक्षा आणि टेहळणी वाढवण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देणे
- संपूर्ण ठाणे शहरातील सीसीटीव्ही टेहळणीसाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करणे
ठळक वैशिष्ट्ये/घटक:
-
- संपूर्ण शहरासाठी विनामूल्य वायफाय सुविधा देणारा हा प्रकल्प नाविन्यपूर्ण अशा आर्थिक मॉडेलवर आधारित आहे ज्यामध्ये संपूर्ण प्रकल्पाचे कॅपेक्स (Capital expenditures) आणि ऑपेक्स (Operating expenses) कंत्राटदाराने करायचे आहे. त्यांच्या सुविधांसाठी महसुलाची वाटणी करण्याचा मसुदा तयार करणे आहे त्याअंतर्गत उत्पन्नासाठी वायफायच्या वरून इंटरनेटच्या मुल्यावर्धित प्लॅन्सची विक्री करणे प्रस्तावित आहे. सेवा प्रदात्याने उल्लेख केल्याप्रमाणे टीएमसीला प्रत्येक वर्षी महसुलाचे काही टक्के उत्पन्न मिळेल.
-
- यामध्ये कोलशेत येथील टीएमसीच्या आवारातील टीएमसीच्या सध्याच्या डेटा सेंटर ते सेवा प्रदात्याचे डेटा सेंटर दरम्यान विनामूल्य कोलोकेशन तसेच हार्डवेअर, संबंधित ऑपरेटिंग सिस्टम यासहीत संपूर्ण मॅनेज्ड सेवा समाविष्ट आहेत.
-
- सेवा प्रदाता, संपूर्ण शहरातील (किमान 1600 कॅमेरे) राऊटर्स आणि टेहळणीचे फुटेज ह्यासाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करेल ज्यामुळे टीएमसीची लक्षणीय बचत होईल.
- सेवा प्रदात्याने वापरावर नजर ठेवणे, 10 वर्षांसाठी सर्वसमावेशक देखरेख, गो-लाईव्ह यशस्वी झाल्यानंतर, 24X7 अपटाईमसाठी आवश्यक स्पेअर्स उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | कार्यादेश देण्यात आलेला आहे. |
कार्यादेश दिनांक: | 17/12/2016 |
ठेकेदाराचे नाव : | Intech Online Pvt. Ltd |
स्थितीः | कार्यान्वीत |
मंजुर निविदा रक्कम: | INR. 42 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | १० वर्षे |
भौतिक प्रगती: | 90% |
आर्थिक प्रगती : | NA |
Expenditure Till Date : | NA |