एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग
टीएमसीला असे जाणवले आहे की नागरिकांना काही सुविधा मिळवण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागतो आणि टीएमसीच्या कार्यालयात अनेक वेळा यावे लागते परिणामी नागरिकांवर ताण पडतो. टीएमसी ने वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेऊन सर्व सुविधा प्रदान करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे, ज्यामध्ये सेवा पुरवणाऱ्या अंतर्गत विभागांचे उत्तरदायित्व, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता या गोष्टींना महत्व देण्यात आले आहे. टीएमसीने अंतर्गत व्यवस्थापनासाठी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग प्रस्तावित केले आहे, जेणेकरून त्यातील एकात्मिक एप्लिकेशनमुळे सेवांचे व्यवस्थापन आणि बॅक ऑफिसमधील अनेक कार्य संगणीकृत करणे शक्य होणार आहे.
अधिक