इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
कोणत्याही शहरातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे वाहतूक. शाळा, कॉलेज, कार्यालये किंवा कोणत्याही अन्य कारणासाठी नागरिक हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर हा शहरांमध्ये प्रवासासाठी करत असतात. प्रवाश्यांचा प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी तसेच वाहतूक सेवा प्रवासी केंद्री होण्यासाठी इटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) ची अंमलबजावणी करणे ही आवश्यक बाब आहे. याकरीता ठाणे स्मार्ट सिटी लि. ने हा बदल करणारा उपक्रम हाती घेतला असून यामुळे कार्यक्षमता वाढून वेळेची बचत, किमान वाहतूक कोंडी आणि प्रदुषण कमी होऊन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीची आगाऊ माहिती मिळून त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचून सुरक्षा आणि आराम अधिक प्रमाणात प्राप्त होऊ शकेल.
उद्दिष्टे:
- Enhance Mobility by increased system efficiency and improved individual mobility – for all of society including both young and elderly.
- प्रवाश्यांसाठी पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (PIS) अंतर्गत बस स्टॉप वर एलईडी डिस्प्ले बसवणे, या डिस्प्ले वर बसेसचे रिअल टाईल ईटीए दर्शवले जाईल.
- बस मध्ये ऑन बस जीपीएस उपकरण बसविण्यात आल्याने बसेसचे रिअल टाईम लाईव्ह ट्रॅकिंग करून नागरिकांना अधिक सुरक्षा प्राप्त करून देणे.
- वापरण्यास सोप्या अशा ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ या मोबाईल ॲप मुळे नागरिकांना रिअल टाईम बसची माहिती उपलब्ध करून देणे.
- सुयोग्य व्यवस्थापनासाठी आयटीएस चे सेंट्रल कंट्रोल सेंटर (सीसीसी) बरोबर एकत्रिकरण करणे.
- सीसीसी मध्ये अलार्म मॅनेजमेंट, व्हेईकल शेड्युल ट्रॅकिंग, व्हेईकल हेल्थ मॉनिटरींग आणि डायग्नोस्टिक्स, स्पीड मॅनेजमेंट, स्टॉपेज मॅनेजमेंट, रूट रिप्लेज, बस ट्रॅकिंग डॅशबोर्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे.
ठळक वैशिष्टये/घटक
- बस स्टॉपवर पीआयएस एलईडी डिस्प्ले बोर्ड्स बसवणे.
- ऑन बस जीआयएस ट्रॅकिंग उपकरणे.
- नागरिकांसाठी ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲप .
- व्हेईकल ट्रॅकिंग ॲन्ड मॉनिटरींग साठी सेंट्रल कंट्रोल सेंटर (सीसीसी) ॲप्लिकेशन.
- या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी गरजेच्या हार्डवेअर ची खरेदी.
- गो लाईव्ह नंतर 3 वर्षां पर्यंत देखभाल.
- या पध्दतीच्या अंमलबजावणी साठी आवश्यक मनुष्यबळ
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | काम पूर्ण |
कार्यादेश दिनांक: | 30/06/2016 |
ठेकेदाराचे नाव : | KPMG Advisory Services |
स्थितीः | कार्यान्वीत |
मंजुर निविदा रक्कम: | INR. 4.07 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | ३ वर्ष |
भौतिक प्रगती: | 100% |
आर्थिक प्रगती : | 70% |
Expenditure Till Date: | INR 2.85 Cr |