मलवाहीनी टाकणे व कार्यान्वित करणे
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
मलजल (सांडपाणी) वहन व त्याची योग्य प्रकारे विल्हवाट लावणे ही महत्वाची पायाभुत सुविधा ठाणे महानगरपालिकेमार्फत पुरविली जाते. ठाणे महानगरपालिकेमार्फत यापुर्वीच सांडपाणी (मलजल) वहन करणे व सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडणेकरीता भुयारी गटार योजना हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तथापि, सदर भुयारी गटार योजेच्या मुख्य मलनि:सारण व्यवस्थेस जुन्या मलवाहीनीवरील मलजल जोडण्यात तसेच नव्याने विकसित झालेल्या भागातील सदनिकांच्या मलजोडण्या करणे आवश्यक आहे.
याकरीता स्मार्ट सिटी अंतर्गत सदर प्रकल्प राबविण्यात येत असुन सदर प्रकल्पाचा मुख्य उद्देश, हा स्मार्ट सिटी क्षेत्राधारित भागात भुयारी गटार योजनेच्या पर्यसमावेशक सुधारणा करणे, कार्यक्षम मलवहन प्रणाली विकसित करून पाण्याचे प्रदूषण टाळणे व निरोगी व स्वच्छ वातावरण निर्माण करणे हे आहे.
-
- मलवाहीनी टाकणे व कार्यान्वित करणे - 36 कि.मी.
-
- घरांच्या मलजल जोडण्या - सुमारे 7400
- मॅनहोल चेंबर - सुमारे 2000
The outcome of the Project
-
- निर्वहन मानका नुसार कार्यक्षम मलजल व सांडपाणी प्रक्रिया करणे.
-
- भुजल पाण्याची गुणवत्ता सुधारणे.
-
- दुषीत पाण्याद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे.
-
- मलजल वहनव प्रक्रिया सुविधेचा जास्तीत जास्त वापर करणे.
-
- मलजल प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्या व्यतिरिक्त इतर कामांकरीता वापर करण्याकरीता व्यवहार्यता अभ्यासणे.
- मलनि:सारण व्यवस्थेचा देखभाल व दुरुस्तीच्या खर्चात कपात करणे व नागरीकांना निरोगी स्वच्छ सुविधा व सेवा पुरविणे.
निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती: | कार्यादेश देण्यात आलेला आहे. |
कार्यादेश दिनांक: | 23/01/2019 |
ठेकेदाराचे नाव : | मे. अथर्व कन्स्ट्रक्शन |
स्थितीः | Work in progress |
मंजुर निविदा रक्कम: | INR 22.87 Cr |
प्रकल्पाचा कालावधी : | 18 months |
भौतिक प्रगती: | 95% |
आर्थिक प्रगती : | 86% |
Expenditure Till Date: | INR 19.62 Cr |