267 केडब्ल्यू स्कूल सोलर रुफटॉप प्रकल्प

solar 4
Solar Rooftop 3
Solar Rooftop 2
Solar Rooftop 1

एकूणच प्रकल्प पूर्ण

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या परंपरागत उर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने सरकार कडून वारंवार नव व नवकरणीय उर्जेचा वापर हा सोलर सिटी उपक्रमांअंतर्गत राबवण्यात येत आहे. एक ‘व्हीजन ऑफ सिटी’ असल्याने सध्याच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून नवीन आणि पुर्ननवीकरणीय उर्जा निर्माण करण्यार्‍या योजना सुरू केल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेने या उपक्रमाची सुरूवात करत ‘ ग्रीड कनेक्टेड सोलर पीव्ही पावर प्रकल्पांची सुरूवात नेट मीटरींग योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींवर हे प्रकल्प’ सुरू केले आहेत.

उद्दिष्टये :

  • पीव्ही सोलर सिस्टम च्या क्षमतेत वाढ करणे.

  • डीसी/एसी मध्ये बदल करतांना सोलर पीव्ही सिस्टम मधील बॅटरीज नसल्याने जास्त कार्यक्षमता करणे

  • सौर उर्जेच्या वापरास चालना देणे आणि लोकांना उर्जेच्या स्वतंत्रतेबाबत उदाहरणासह प्रोत्साहीत करणे.

  • सौर उर्जेवरील उपकरणांच्या वापरास प्रोत्साहन देणे.

  • ‘नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पनेचा प्रसार करणे, ज्यामध्ये त्या इमारतीच्या सर्व उर्जा गरजा अंतर्गतपणे पूर्ण होऊन शहरातील नागरिकांना क्रांतिकारी सौर उर्जेचा लाभ होऊ शकेल.

  • सोलर पीव्ही सिस्टम मधून तयार झालेल्या वीजेचा स्वस्त दरात वापर करणे. हरीत आणि कमी खर्चाचे उपाय करून कार्बन फूटप्रिंट कमी करणे.

नागरिकांना होणारा लाभ

    • सौर पीव्ही प्रणालीतून निर्माण होणारी वीज प्रति युनिट स्वस्त दरात पुरवठा

 

  • Reduction in the overall carbon footprint by promoting green cost-effective solutions

प्रकल्पाची सद्यस्थिती काम पूर्ण

निविदा प्रसिद्ध दिनांक : 01/08/2016
सद्यस्थिती: कार्यादेश देण्यात आलेला आहे.
कार्यादेश दिनांक: 07/03/2017
ठेकेदाराचे नाव : M/s. Psquare Technologies (JV)
मंजुर निविदा रक्कम: INR. 2.25 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 1 Year
भौतिक प्रगती: 100%
आर्थिक प्रगती : 0%
Expenditure Till Date: